औरंगाबाद -माझे आजोबाही विचार करतील या गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचे अनावरण होणार आहे अशी, टीका युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हयातील रांजणगाव येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन झाले.यावेळी ते बोलत होते. राज्य ओके नाही, पण हे ओके होऊन बसले. एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेमुळे राज्य मागे गेले असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
गद्दाराच्या हाताने अनावरण - उद्या शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रांचे अनावरण विधिमंडळात केले जाणार आहे. या प्रकारावर देखील आदित्य ठाकरे यांनी कडाडून टीका केली. या गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचे अनावरण झाले असे माझे आजोबा म्हणतील. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या आजोबांच्या तैलचित्रांचे अनावरण होणार असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.
मुख्यमंत्री कुठेही सुरु करतात कॅसेट -कशाची भीती होती म्हणून सुरतला पळून गेलात, तुम्ही असं काय खाल्लं होतं जे अपचन झाल्यानंतर पचन होण्यासाठी एवढ्या दूर जावं लागले असा, सवाल त्यांनी उपस्थित केला. तर रांजणगाव येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी इथे जर घटनाबाह्य मुख्यमंत्री आले असते तर, त्यांनी आपली कॅसेट सुरू केली असती. ते कुठेही जातात तिथे उदाहरणे देतात. दहीहंडीला गेलं तर सहा महिन्यापूर्वी आम्ही थर रचला असं म्हणतात, इथे आले असते तर, सहा महिन्यापूर्वी आम्ही षटकार ठोकला अशी टेप त्यांनी सुरू केली असती अशी, टीका आदित्य ठाकरे यांनी केली.