छत्रपती संभाजीनगर : Aaditya Thackeray Criticizes BJP :एका अधु बाळाने यांना 'सळो की पळो' करून सोडलं. आम्ही ओळखत असलेली ही भाजपा नाही. आम्ही वाजपेयींच्या आडवानांची भाजपा ओळखत होतो. मात्र आता ही वेगळीच भाजपा आहे. आम्ही आमची संस्कृती आणि पातळी सोडणार नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. वाघनखे आमच्यासाठी दैवत आहेत. मात्र ते आणताना कायमचे आणणार का? हा आमचा प्रश्न होता. जर ते कायमचे देशात आणणार असाल तर मंदिर करावं. कारण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत. आमच्यामुळे भाजपाला खर बोलावं लागलं आणि त्यांनी सुधारित जीआर काढला, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
रागाने अंगावर येतात:भाजपा किती दिवस खोटं बोलणार, प्रश्न विचारल्यावर रागाने अंगावर येतात, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. राज्यातील मंत्र्यांच्या प्रदेश वाऱ्यांवर मी बोललो आहे. दोन, तीन परदेश वाऱ्या आमच्यामुळे रद्द झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर कलाकारांना बोलून फोटो काढायचे होते. मी ट्विट केल्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा देखील रद्द केला; मात्र त्याला अतिपावसाचे नाव दिले. आता उद्योग मंत्री दौरा करणार आहेत. त्यांनी उद्योगांवर बैठक घ्यावी. हरकत नाही; मात्र कोणासोबत बैठक आहे, किती गुंतवणूक येणार हे त्यांनी जनतेला सांगावं इतकीच अपेक्षा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. नारायण राणे यांना आमच्यावर टीका करण्यासाठी पगार मिळतो. त्यांच्यावर काही बोलणार नाही, अशी मिश्किल टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली.