औरंगाबाद- पैठण नाथसागर धरणामध्ये एका महिलेचा मृतदेह पाण्यात तरगंताना आढळला. या महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याचा पोलीस तपास करत आहेत.
नाथसागर धरणाच्या पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह
पैठण नाथसागर धरणामध्ये एका महिलेचा मृतदेह पाण्यात तरगंताना आढळला आहे. घटनेचा तपास पैठण पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणाच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला. मृत महिलेचे वय 20 ते 25 वर्षे असून ती विवाहित असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
महिलेच्या मृतदेह बाहेर काढल्यानंतर तिच्या जवळ मोबाईल, पर्स किंवा कोणतीही वस्तू आढळली नाही. त्यामुळे तिची ओळख पटेल, अशी कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. ही आत्महत्या, की हत्या आहे, याबाबत पैठण पोलीस तपास करत आहेत. या महिलेचा मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक भागिरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक कातडे हे करत आहेत.