महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..तर आत्मदहन करू ! औरंगाबादमध्ये व्यापाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा - व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मागील एक वर्षापासून व्यवसायात अनेक चढउतार आल्याने मोठं नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावं लागलं आहे. त्यात 25 दिवस पुन्हा बंद केल्याने व्यवसाय कोलमडण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे कडक निर्बंध लावून आम्हाला व्यवसायाची परवानगी द्या, अन्यथा आर्थिक मदतीची घोषणा करा.

व्यापारी
व्यापारी

By

Published : Apr 7, 2021, 6:13 PM IST

औरंगाबाद - राज्यात 'ब्रेक द चेन' अंतर्गत नवीन निर्बंध राज्य सरकारने लागू केले आहे. या आदेशांबाबत अनेकामध्ये संभ्रम असतानाच सर्व व्यापार मात्र बंद झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक संतप्त झाले आहेत. नियम बदल अन्यथा 9 एप्रिलनंतर व्यापार सुरू करू, अशी भूमिका औरंगाबाद व्यापारी संघटनांनी जाहीर केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट
राज्य सरकारने लावलेले निर्बंधा विरोधात औरंगाबाद व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेत, व्यापाऱ्यांनाची भूमिका जाहीर केली आहे. अचानक लागू केलेला निर्णय निर्बंध नसून लॉकडाऊनच आहे. त्यामुळे व्यापारी संभ्रम अवस्थेत आहेत. व्यापार उद्धवस्त होईल, त्यामुळे नियम बदला नाहीतर आत्मदहणाची परवानगी द्या, अशी मागणी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

औरंगाबाद व्यापारी संघटना

निर्बंध लावून परवानगी द्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध लावू अस जाहीर केलं. मात्र प्रत्यक्षात लॉकडाऊनच लावण्यात आला आहे. मागील एक वर्षांपासून व्यवसायात अनेक चढ उतार आल्याने मोठं नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागले आहे. त्यात 25 दिवस पुन्हा बंद केल्याने व्यवसाय कोलमडण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे कडक निर्बंध लावून आम्हाला व्यवसायाची परवानगी द्या, अन्यथा आर्थिक मदतीची घोषणा करा. अशी मागणी औरंगाबाद जिल्हा व्यापारी संघटकनेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केली आहे.

हेही वाचा-शाळा बंद असल्याने स्कुल व्हॅन चालकाने व्हॅनमध्ये सुरू केली रसवंती

ABOUT THE AUTHOR

...view details