औरंगाबाद:मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक एमएच 04 एफजे 5288 ने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी दूरपर्यंत फरफटत नेली. ज्यात एक पुरुष, महिलासह एक मुलगी दुर्घटनाग्रस्त झाले. अपघात होताच नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.
A terrible accident : वाळूज भागात ट्रकची दुचाकीला धडक, तिघांचा जागीच मृत्यू - तिघांचा जागीच मृत्यू
वाळूज भागात सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. ट्रकने एका दुचाकीस्वारांना चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास वाळूज भागातील रांजणगाव शेणपुंजी परिसरातील एनआरबी चौकात हा अपघात घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. ( three died on the spot, A truck collided with a two wheeler )
तिघांचा जागीच मृत्यू
अपघात झाल्यावर रस्त्यावर काही वेळेसाठी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहचले असून, मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ( three died on the spot, A truck collided with a two wheeler )