महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : गंगापूर-औरंगाबाद मार्गावर कापूस घेऊन जाणाऱ्या ट्र्कला आग.. कापसासह ट्रक जळून खाक - कापसासह ट्रक जळून खाक

गापूर औरंगाबाद मार्गावर हॉटेल विराजजवळ औरंगाबादच्या दिशेने कापूस घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे.

truck caught fire
truck caught fire

By

Published : Oct 9, 2021, 5:47 PM IST

Updated : Oct 9, 2021, 6:35 PM IST

गंगापूर (औरंगाबाद) - गंगापूर औरंगाबाद मार्गावर हॉटेल विराजजवळ औरंगाबादच्या दिशेने कापूस घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गंगापूरकडून औरंगाबादच्या दिशेने कापूस घेऊन जात असलेला ट्रक क्रमांक (mh १५ EG६३१८) पलटी होऊन विद्युत खांबाजवळ ट्रकने पेट घेतला. ट्रकमधील कापसासह ट्रक जळून खाक झाला आहे.

गंगापूर-औरंगाबाद मार्गावर कापूस घेऊन जाणाऱ्या ट्र्कला आग

सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र ट्रक जळून खाक -

गाडी चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीतून उडी मारल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. आग लागल्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. ट्रकमधील कापूस व ट्रक जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच गंगापूरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.

हे ही वाचा -क्रुझवरील पार्टीतून पकडलेल्या भाजप नेत्याच्या मेहुण्याला व दोन मित्रांना सोडण्यासाठी फोन - नवाब मलिक

Last Updated : Oct 9, 2021, 6:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details