औरंगाबाद- भावाच्या मुलाचे लग्न आटोपून, दुचाकीने बीड जिल्ह्यातील राजपिंप्री गावाच्या दिशेने निघालेल्या आई व मुलाला समोरुन भरधाव आलेल्या कारने चिरडले. रविवारी दुपारी चारच्या सुमारास नवीन बायपास रस्त्यावरील, गांधेली शिवाराजवळ हा अपघात घडला. या अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला.
भरधाव कारने आई व मुलाला चिरडले, गांधेली शिवाराजवळ भीषण अपघात - भीषण अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील कौशल्याबाई किशन धोत्रे (४८) व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर धोत्रे (२५) दोघेही रा. राजपिंप्री हे वाळुज परिसरात नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी आले होते. दुचाकीने बीड जिल्ह्यातील राजपिंप्री गावाच्या दिशेने निघालेल्या आई व मुलाला समोरुन भरधाव आलेल्या कारने चिरडले. या भीषण अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला.
गांधेली शिवाराजवळील भीषण अपघात
गांधेली शिवाराजवळ झाला अपघात
दोघांचा मृत्यू
या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार काशीनाथ लुटे, सोपान डकले, संतोष टिमकीकर आणि संपत राठोड या दोघांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषीत केले. या अपघाताची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
हेही वाचा- भाजपा आमदाराच्या मर्सिडीज कारवर हल्ला; सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू