महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावत्र बापाने केली दीड वर्षाच्या मुलीची हत्या; औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार - सावत्र मुलीचा खून

पत्नीसोबत झालेल्या भांडणातून अल्पवयीन मुलाने दीड वर्षाच्या सावत्र मुलीला मारून टाकले. त्यानंतर तिचा मृतदेह मातीत पुरून दिल्याची घटना घडली आहे.

a minor stepfather killed a one and a half year old girl In Aurangabad
औरंगाबाद

By

Published : May 21, 2021, 10:40 AM IST

Updated : May 21, 2021, 10:39 PM IST

गंगापूर (औरंगाबाद) -गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथील रहिवासी अल्पवयीन सावत्र बापाने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीचा जमिनीवर आपटून तीची हत्या केल्याची घटना बुधवारी 19 रोजी भेंडाळा शिवारातील अंतापुरात घडली होती. करण वैष्या भोसले (१५) असे आरोपी बापाचे नाव असून या घटनेची माहिती अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांना दिली.

दोन महिन्यांपूर्वी झाल होता विवाह -

आरोपी करण भोसले याचे दोन महिन्यापूर्वी अश्विनी या महिलेशी लग्न झाले होते. तसेच आश्विनीचे पहिले लग्न झाले असून तीचा घटस्पोट झाला होता. तसेच तीला दीड वर्षाची मुलगी होती. अश्विनी मुलीला घेऊनच आरोपी करणसोबत भेंडाळा येथे राहत होती. परंतु अश्विनीची मुलीविषयी आरोपी करणच्या मनात राग होता. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास त्याने भेंडाळा शिवारातील अंतापूर येथील शेतशिवारात तिचा गळा दाबून आणि जमिनीवर आपटून हत्या केली. तसेच कोणालाही याबाबतीत माहिती होऊ नये म्हणून तिचा मृतदेह जमिनीत पुरून टाकला.

अश्विनी दिराच्या मुलीला घेऊन फरार -

नवऱ्याने आपल्या मुलीची हत्या केल्याचे कळताच अश्विनीने आपल्या दिराच्या दोन वर्षाच्या रियाला घेऊन पळ काढला. रागाच्या भरात दिराच्या मुलीला घेऊन फरार झालेली आश्विनी रियाचे काही बरे वाईट करेल, अशी चिंता रियाचे आजी आजोबा, आई वडील यांना लागली असून आमची मुलगी शोधून आणा अशी आर्त हाक गंगापूर पोलिसांना केली आहे.

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली -

याप्रकरणी पोलिसांनी सावत्र बापाला ताब्यात घेत घटनास्थळावरून पुरलेला मृतदेह बाहेर काढला. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मुलीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला.

हेही वाचा - गोंदियात 62 वर्षीय महिलेला दहा मिनिटांच्या अंतराने कोविशिल्डचे दिले दोन डोस.. महिलेचा आरोप

Last Updated : May 21, 2021, 10:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details