औरंगाबाद - सिडको परिसरातील अल्पवयीन मुलीला शेजारी राहणाऱ्या तरुणाने पळवून नेत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची घटना घडली होती. यातील आरोपीला सिडको पोलिसांनी सोमवारी (दि.27) रात्री बेड्या ठोकल्या.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी व 18 वर्षीय आरोपी हे शेजारी राहतात. 24 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पीडितेची आई कामाला गेली होती. त्यावेळी मुलगा आणि मुलगी दोघेच घरी होते. पीडितेची आई कामावरून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरी आल्या असता मुलगी घरी नव्हती. यावेळी मुलाला विचारले असता पीडिता ही दुपारी दोन वाजता मैत्रीणीकडे जाऊन येते, असे सांगून गेल्याचे त्याने सांगितले. पण, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ती परतली नसल्याने पीडितेच्या आईने तिचा शोध घतेला. पण, ती सापडली नाही. नंतर सिडको पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईने हरवल्याबाबतची तक्रार दिली होती.