महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बबला गँगच्या सदस्य मुर्गीचा दगडाने ठेचून खून - बबला गँगच्या सदस्य मुर्गीचा दगडाने ठेचून खून

भांडण झाल्याच्या कारणावरून बबला गँगमधील एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. बारापुला नाल्यात (खामनदी) त्याचा मृतदेह आढळून आला. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्याने परिसरात अफवा पसरवली होती.

मु्र्गीसदस्याचा मृत्यू
मु्र्गीसदस्याचा मृत्यू

By

Published : May 30, 2021, 11:11 AM IST

औरंगाबाद - भांडण झाल्याच्या कारणावरून बबला गँगमधील एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. बारापुला नाल्यात (खामनदी) त्याचा मृतदेह आढळून आला. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्याने परिसरात अफवा पसरवली होती.

शेख माजीद उर्फ मुर्गी शेख अली (वय २८, रा. खडकेश्वर) असे मृताचे नाव आहे. तो बबला गँगचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरात गेल्या काही दिवसात दगडाने ठेचून खून केल्याची ही तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे गँगवॉरमधून वाळुज एमआयडीसीतील बजाजनगरात दगडाने ठेचून कुख्यात गुन्हेगाराचा खून केला होता. अशीच घटना गँगवॉरमधून पुन्हा घडल्याचे समोर आले आहे.

गँगवॉरमधूनच खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज...
शुक्रवारी (ता. २८) मे रोजी रात्री आठ ते नऊच्या सुमारास माजीद उर्फ मुर्गी हा मिल कॉर्नर येथील एका हॉटेलात शिरताना त्याचे वडील शेख अली यांनी पाहिले. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास माजीद उर्फ मुर्गी हा नशेतच घरी आला. त्यानंतर आपले हॉटेलात भांडण झाल्याचे सांगत त्याने वडिलांकडून शंभर रुपये घेतले. त्यावेळी त्याच्याकडे चाकू होता, अशी माहितीही त्याच्या वडीलांनी दिली. त्यानंतर मात्र शनिवारी (ता. २९) दुपारी थेट त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. माजीद उर्फ मुर्गी याचा गँगवॉरमधूनच खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच्यावर पूर्वी खूनाचा आरोप आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव...
या घटनेनंतर सहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक मनोज पगारे, उपनिरीक्षक सचिन वायाळ, पोलिस नाईक अशोक नागरगोजे, शिपाई सिध्दार्थ थोरात व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

श्वान पथकाला पाचारण....
घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी व श्वान पथकाला पाचारण केले होते. फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाच्या प्रसंगाचे पुरावे गोळा करण्याचे काम केले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details