औरंगाबाद- ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल गुन्हेगाराला गावठी पिस्तूल आणि काडतुसासह आज पैठण तालुक्यातील पाचोड येथून अटक केली. सचदेव मुराब पवार (वय २७, रा. रामगव्हाण, ता.अंबड, जि.जालना) असे अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ६० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
औरंगाबादेत गावठी पिस्तुलसह अट्टल गुन्हेगाराला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - पाचोड गुन्हेगारी
पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, अट्टल गुन्हेगार सचदेव पवार हा गावठी पिस्तुलसह शिवाजीनगर पाचोड येथे रस्त्यावर उभा आहे. त्यावरून फुंदे यांच्यासह पथकाने सापळा रचून सचदेवला अटक केली. पोलिसांनी सचदेवकडून एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, विविध बँकांचे तीन एटीएम कार्ड आणि मोबाईल असा एकूण ६० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज पाचोड परिसरामध्ये गुन्ह्याच्या तपासासाठी गेले होते. यावेळी पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, अट्टल गुन्हेगार सचदेव पवार हा गावठी पिस्तुलासह शिवाजीनगर पाचोड येथे रस्त्यावर उभा आहे. त्यावरून फुंदे यांच्यासह पथकाने सापळा रचून सचदेवला अटक केली. पोलिसांनी सचदेवकडून एक गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, विविध बँकांचे तीन एटीएम कार्ड आणि मोबाईल असा एकूण ६० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सचदेव याच्या विरुद्ध दरोडा, दरोड्याचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक फुंदे यांनी सांगितले.