नांदेड - १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यासाठी 'मराठवाडा मुक्तिदिन' Marathwada Liberation Day महाराष्ट्र शासन दरवर्षी साजरा करतो. हा दिवस अधिकृतरित्या मराठवाड्यापुरता स्वातंत्र्यदिनासारखा साजरा Marathwada Mukti Sangram Din केला जातो. शासकीय ध्वजारोहण वगैरे सोपस्कार यथासांग पार Flag Hoisting on Marathwada Liberation Dayपडतात. तसी एक घटना म्हणून हा हैदराबाद मुक्तिसंग्राम. निजामी राजवटीतून हैदराबाद मुक्त झाले तो हा दिवस. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण हैदराबाद संस्थान मात्र भारतीय संघराज्यात विलीन झाले नाही. तेरा महिन्यानंतर १७ सप्टेंबर १९४८ला हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात समाविष्ट झाले. त्यासाठी लढा उभा राहिला. 'पोलीस ॲक्शन' झाले आणि निजामी राजवटीतील रझाकारी संपली. याचे श्रेय जसे स्वामी रामानंद तीर्थ यांना तसेच ते पोलीस ॲक्शन घडविणारे देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनाही द्यावे लागेल.
मोगली कारभारात मराठवाडा - इ.स.च्या १४व्या शतकाच्या प्रारंभी मराठवाडा मुस्लिमांच्या अंमलाखाली आला. एकूण १५० वर्षे हा परिसर निजामशाहीच्या मोगली कारभारात राहिला.पश्चिमेत महाराष्ट्रातील चळवळीपासून हा भाग अनेक वर्षे अलिप्त राहिला. महाराष्ट्रात इंग्रजी शिक्षणामुळे आलेली नवजागृती निझामी राज्याला स्पर्शही करू शकली नाही. १९४८ नंतर लहानमोठी अधिवेशने घ्यायला प्रारंभ झाला. परिणामी परिसरात सामाजिक पुनरुज्जीवनाचे चलनवलन सुरू झाले. २०व्या शतकाच्या पहिल्या पंचविशीत मराठी साहित्य परिषदेच्या अधिवेशनासाठीही निझाम सरकारकडून परवानगी नाकारली गेली. महाराष्ट्र परिषद ही राजकीय व्यासपीठ बनली. साहित्य, संस्कृती यापेक्षा धार्मिक भूमिकेतून मुस्लिमांना विरोध झाला. गणपती उत्सव, मेळे या माध्यमातून प्रतिकार सुरू झाला. स्वातंत्र्यासंबंधीची जाणीव कीर्तनातून, धार्मिक उपक्रमांतून अप्रत्यक्षपणे प्रगट होत गेली. वाचनालये, व्यायामशाळा यांच्याआडून हे सगळे होत गेले.
हिंदू महासभा, आर्य समाज - हिंदू महासभा, आर्य समाज यासारख्या संघटनांनी मुस्लिमांचे हिंदू धर्मावरील आक्रमण थोपविण्याचा, जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ध्वज, झेंडा, मंदिरे, मिरवणुका, यात्रा, दिंड्या, उत्सव यावरील निजामी सत्तेने घातलेली बंदी नाकारण्याचा प्रयत्न झाला. नवविचार जागरणापेक्षा पुनरुज्जीवनवादी भूमिकाच प्रभावी ठरत गेली. साहित्य व संस्कृती यांच्या नात्यातून उमटलेला हाच स्वर प्रमुख ठरला.
उर्दू भाषेतूनच शिक्षण - शिक्षणाचे माध्यम संस्थानची राजभाषा उर्दू असल्यामुळे त्या भाषेतूनच शिक्षण दिले जाई. मातृभाषा मराठीचा अभिमान अधूनमधून प्रगट होत गेला. हैदराबाद संस्थान त्रैभाषिक तेलुगू, कन्नड आणि मराठी असून भाषिक एकात्मता राखणे कठीण होते. म्हणून धार्मिक एकता राखणे सोयीचे गेले. सर्व संस्थानभर उठाव झाले ते धर्मांतर, धर्म यावरील निजामी अत्याचार, अन्याय वगैरेविरुद्धच. त्याचबरोबर संतपरंपरा सर्वश्रेष्ठ मानणारी मराठवाडी मानसिकता स्वामी रामानंद तीर्थ या संन्याशाचे नेतृत्व मानते, यालाही एक अर्थ आहे. अहिंसा, असहकार, सत्याग्रह, प्रतिकार, निषेध या गांधीप्रणालीच्या जोडील मराठवाड्यापुरती तरी 'पोलीस ॲक्शन'ची कामगिरी उजवी ठरली हे मानावेच लागते. महात्म्यापेक्षा हौतात्म्य यातील साहसरमणीयत्व अद्भुत व आकर्षक वाटते. हुतात्मा पानसरे, बहिर्जी यांचे पोवाडे हा मराठवाडी आधुनिक साहित्याच खरा वारसा. त्यातूनच सिद्ध झाली आधुनिक मराठवाडी कविता. १९४८ म्हणजे मराठवाड्यापुरते स्वातंत्र्यप्राप्तीचे वर्ष. तेलंगणा, कर्नाटक हे दोन्हीही त्याचवेळी स्वतंत्र झाले. भारतीय स्वातंत्र्यासारखा स्वातंत्र्यदिन तेलंगाणा, कर्नाटक यांनी सुरू करायला काय हरकत आहे? पण तसे घडले नाही. मराठवाड्याने मात्र ही अस्मितेची ज्योत तेवत ठेवली म्हणून 'मराठवाडा मुक्तिसंग्राम' हे नामाभिधान सार्थ, समर्पक व संदर्भप्राप्त ठरते.
तुरळक संस्कृत पाठशाळा -मध्ययुगीन परंपरा हाडीमासी भिनल्यामुळे साहित्यात आधुनिकता येणे तसे शक्य नव्हते. पूर्वसंचित, सनातनी मनोवृत्ती याचा परिणाम म्हणजे तत्कालीन साहित्यक्षेत्रातील हालचाल. संतत्व, साधुत्व, अध्यात्मप्रवणता, भक्तिमहिमान, कर्मठ कर्मकांड, स्थितिप्रियता अशा गोष्टींना प्राधान्य. मराठवाडी मानसिकता म्हणजे 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' असेच म्हणावे लागेल. ही मानसिकता बदलण्याचे खास प्रयत्न कोणी केले नाहीत. गावोगाव संत, महंत, साधुसंन्यासी यांचे मठ, देवस्थाने, देवळे ही मराठवाडी परंपराच बनली. ज्या बहामनी राज्यातून हसन गंगुवली बहामनी या वलीचा (साधुपुरुषाचा) तर हा हिंदू वारसा नव्हे? सुफी, नाथपंथी, वारकरी, चैतन्य, शाक्त, महानुभाव, जैन अशा कितीतरी पंथ, संप्रदायाची ठिकाणे मराठवाड्यात सापडतात. देवळाबरोबर दर्गेही आढळतात. समाध्या व पीर दिसतात. मदरस्यांच्या सोबत तुरळक संस्कृत पाठशाळाही होत्या, अशा नोंदी सापडतात.
रझाकारांनी मांडलेला उच्छाद -रझाकारांनी मांडलेला उच्छाद, निझामाचाच उच्छेद करण्यास कारणीभूत ठरला. तिथे धर्म किंवा जात आडवी येत नाही, बंगाली भाषेमुळेच बांगला देशाची निर्मिती होते. उर्दूच्या जाचातून सुटण्याची प्रेरणा मराठी, कवड व तेलुगू भाषिक जनतेला त्यांच्या मायभाषेनेच दिली असेच म्हणावे लागेल. त्याशिवाय धर्म असलेले र. लु. जोशी (रघुवेल ल्युकस जोशी) 'प्रभाती स्मरे मायबोली तुला... अभावी तुझ्या जीव घांदावला' असे उदगार काढतेच ना! इंग्रजीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी इंग्रजी शिकून शहाण्या झालेल्या सिद्धीन प्रचंड स्वातंत्र्य संग्राम उभा केला. अगदी तसाच पण काहीसा क्षीणसा प्रकार इथेही घडला. भाषा हा संस्कृतीच्या महावस्त्रातील एक घट्ट धागा असतो, तो तुटता तुटत नाही. त्या धाग्याची उभी-आडवी बीण इतकी पिळदार असते की 'आजन्म युद्धे तरी संगरी जी कधी भागली नाही एक क्षण' असे सहजच उद्गार निघतात.
निमित्तमात्र घटना -१७ सप्टेंबर १९४८ ही एक निमित्तमात्र घटना. माझ्या वयाच्या ९व्या वर्षी पोलीस ॲक्शन झाले. रझाकारी संपली म्हणजे काय झाले? हे कळण्याचे ते वय नव्हते. पण मनात अबोध अस्पष्ट असे काहीतरी नक्कीच रुजले असेल. त्यातून माझ्या हातून 'मराठवाडा गीत' निर्माण झाले. युतीचे (भाजप-शिवसेना) पहिल्यांदा महाराष्ट्रात सरकार बनले. (१९९५) याच सरकारने 'मराठवाडा मुक्तिदिन' शासकीय स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे मुक्तिदिन थाटात संपन्न झाला. तिथे माझे 'मराठवाडा गीत' गायिले गेले. पं. नाथराव नेरलकरांची चाल तरुणाईने इतकी सुंदर उचलली की मराठवाड्यातील तरुणाईच्या ओठी ती सहज रुळली. हेच गीत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्तंभावर कोरले गेले आहे. एकूण शब्दांकित, स्वरांकित आणि शिल्पांकित असा या गीताचा प्रवास झाला आहे. या गीताचे स्तंभांकन होण्यात महाराष्ट्राचे आजचे परिवहनमंत्री मा. दिवाकरजी रावते (तत्कालीन मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष) यांचा सिंहाचा वाटा आहे.
मराठवाडा गीताचा तिहेरी प्रवास -महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीच्या पहिल्या सरकारने मराठवाडा मुक्तिदिन शासकीय स्तरावर साजरा करण्याचा निर्णय १९९५ साली सत्तेवर आल्यानंतर घेतला. त्याचवेळी शिवसेनेचे तत्कालीन नेते दिवाकर रावते यांनी नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांच्याकडून मराठवाडा गीत लिहून घेतले. शासकीय पातळीवरील पहिल्या मुक्तिदिन कार्यक्रमात हे गीत पंडित नाथ नेरलकर व त्यांच्या चमूने औरंगाबाद येथील कार्यक्रमात पहिल्यांदा सादर केले. हेच गीत नंतर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या स्तंभावर कोरले गेले आहे. शब्दांकित, स्वरांकित आणि शिल्पांकित असा तिहेरी प्रवास या गीताच्या वाट्याला
आला.
मराठवाड्याचा मानदंड -मराठवाड्याचा मानदंड साक्षात करताना जो आनंद झाला तो केवळ शब्दातीत. उद्याचा मराठवाडा कसा असेल ते मी कसे सांगणार? मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्याचा सूर तर उमटू लागला आहेच. तोवर आपण म्हणूया "या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू".