महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गरम पाण्यात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू - गरम पाण्यात पडून मुलीचा मृत्यू

३ वर्षीय चिमुकली खेळता-खेळता अचानक आंघोळीसाठी काढून ठेवलेल्या गरम पाण्यात पडली. यांनतर तिचा उपचारादरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला.

aur
गरम पाण्यात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

By

Published : Dec 4, 2019, 5:21 PM IST

औरंगाबाद -अंगणामध्ये खेळताना गरम पाण्यात पडल्यामुळे एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी सेंट्रल नाका येथील मनपा क्वार्टरमध्ये घडली होती. यांतर आज पहाटे (बुधवारी) उपचारादरम्यान या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. आराध्या आकाश शिंदे (वय 3) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

गरम पाण्यात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

२७ नोव्हेंबरला सकाळी अंघोळीसाठी गरम पाणी चुलीवर ठेवलेले होते. पाणी उकळत असल्याने आराध्याच्या आईने ते पाण्याचे पातेले चुलीवरून उतरवून खाली ठेवले आणि घरातील इतर कामे करू लागली. दरम्यान, अंगणात खेळणारी आराध्या ही त्या पाण्यात पडली, तिच्या किंकाळ्या कानावर येताच आईने धाव घेत तिला त्या उकळत्या पाण्यातून बाहेर काढुन रुग्णालयात हलविले. तेव्हापासून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, या उपचारादरम्यान तिचा मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, आराध्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details