गंगापूर (औरंगाबाद) -समुद्रात मासेमारी हा अनेकांचा पारंपरिक व्यवसाय रोज वेगवेगळे हजारो मासे पकडले जातात. विक्रीसाठी बाजारात आणले जातात मात्र गंगापूर तालुक्यातील ममदापूर येथील मच्छीमाराला गोदावरी ( Fishing in Godavari river ) नदीत जाळ्यात 16 किलोचा मासा अडकला ( 16 kg Fish In Net in River Godavari ) आहे. तो मासा पाहण्यासाठी आता गर्दी होत आहे.
16 किलोचा मासा असतो कसा ?एक दोन किलोचे मासे मिळणे म्हणजे गोदावरी नदीतील ( Godavari river ) मासेमारांची ( Fishing in Godavari river ) नियमित मासेमारी त्यात पाच सात किलोचा मासा सापडला तर, मासेमारांनी जल्लोष करावा अशी स्थिती असते. अशावेळी गोदावरी नदीत मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराला तब्बल सोळा किलो ( A fish weighing sixteen kilos ) वजनाचा सिल्वर प्रजातीचा मासा सापडल्याने मासेमारी करणाऱ्याच्या आनंदाला भरती आली.
16 किलो वजनाचा मोठा मासा अडकला -गोदावरी नदीत एवढा मोठा मासा आढळणे तसे दुर्मिळच आहे त्यामुळे त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. मच्छीमार आकाश पल्हारे याला गोदावरी नदीपात्रात मासेमारी करताना सिल्वर प्रजातीचा मासा गोदावरी नदीत मासेमारी करताना सापडला आहे. आकाश पल्हारे हा लहानपणापासून गोदावरी नदी पात्रात मासेमारी करतो. गोदावरी नदी पात्रात माशाच्या अनेक प्रजाती आहेत शुक्रवारी पहाटे त्याच्या जाळ्यात सिल्वर जातीचा 16 किलो वजनाचा मोठा मासा अडकला. मासा मोठा असल्याने तो नदीपात्रातून बाहेर काढणे ही मुश्किल झाले होते.