औरंगाबाद- पैठण तालुक्यातील बिडकीन बँकेची पीक कर्जासाठी बोगस शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्यात 71 बोगस शेतकऱ्यांवर 1 कोटी 9 लाख 71 हजारांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
71 बोगस शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी केली बँकेची फसवणूक - aurangabad latest news
प्रत्येक वर्षी राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप हंगामासाठी पीक कर्ज दिलं जातं. यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र, बिडकीन येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत काही बोगस शेतकऱ्यांनी सात-बारा, आठ-अ, फेरफार नक्कल याची खोटी कागदपत्रे तयार करून बँकेतून पीक कर्ज घेतले होते
![71 बोगस शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी केली बँकेची फसवणूक 71 बोगस शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी केली बँकेची फसवणूक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10173830-thumbnail-3x2-farmer-fasavnuk.jpg)
७१ शेतकऱ्यांकडून बँकेची फसवणूक-
प्रत्येक वर्षी राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप हंगामासाठी पीक कर्ज दिलं जातं. यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र, बिडकीन येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत काही बोगस शेतकऱ्यांनी सात-बारा, आठ-अ, फेरफार नक्कल याची खोटी कागदपत्रे तयार करून बँकेतून पीक कर्ज घेतले होते. मात्र, जेव्हा औरंगाबाद येथील मुख्य शाखेत पीक कर्ज वाटप केलेल्या फाईलची ऑनलाइन फेरतपासणी केली असता समोर आला. त्यात जवळपास 71 शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे देऊन बँकेची फसवणूक करून कर्ज घेतल्याचं खळबळजनक बाब समोर आली आहे.
शेतकऱ्यांकडून खुलासा नाही-
हा सर्व प्रकार समोर येताच बँकेने संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा पाठवून खुलासा मागितला. मात्र, या शेतकऱ्यांकडून कोणताच खुलासा करण्यात आला नसल्याने अखेर बँकेच्या अधिकाऱ्यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला आहे. यात 71 शेतकऱ्यांवर 1 कोटी नऊ लाख 71 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.