औरंगाबाद :एक धक्कादायक घटना समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात जवळपास 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत ( Food Poisoning In NCP leader son marriage ) आहे. जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे 700 जणांची प्रकृती बिघडली असून सर्वांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा बुधवारी लग्नसोहळा पार ( Abdul Qadir Maulana son marriage ) पडला. या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.
Food Poisoning : राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना अन्नातून विषबाधा - Food Poisoning
राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या लग्नात पाहूण्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत ( Food Poisoning In NCP leader son marriage ) आहे. विषबाधेमुळे 700 जणांची प्रकृती बिघडली आहे. अब्दुल कदिर मौलानांच्या मुलाच्या लग्नात ही विषबाधा झाली ( Abdul Qadir Maulana son marriage ) आहे. 700 जणांवर रुग्णालयात उपचार झाले (people treated in hospital ) आहेत.
राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या लग्न समारंभात विषबाधा :राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेर यांचा विवाहसोहळा बुधवारी औरंगाबादमध्ये पार पडला. यावेळी मुलीकडच्या लोकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी केली होती. मात्र याचवेळी लग्नात बनवण्यात आलेल्या स्वयंपाकातून लोकांना विषबाधा झाली. काही वेळात अनेकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 700 जणांना विषबाधा झाली (700 people Poisoned In marriage ) असल्याची माहिती समोर येत आहे. तर त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु होते, त्यात काही रुग्णांना रात्रीच उपचार देऊन सोडण्यात आले (people treated in hospital ) आहे.
गोंधळ उडाला :लग्नसमारंभ सुरु असतानाच जेवणानंतर लोकांना त्रास सुरु झाला. काही वेळात त्रास होणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे गोंधळ उडाला. कुणाला पोटाचा त्रास होऊ लागला तर कुणाला मळमळ होऊ लागली. परिसरातील सर्वच रुग्णालयात देखील अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. याबाबत कदीर मौलाना यांच्या समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांना त्रास होत होता. मात्र कोणीही गंभीर नाही. तसेच सर्वांना रात्रीची तपासून डॉक्टरांनी तात्काळ औषध देऊन सोडण्यात आले. कोणेही गंभीर नाही, तसेच हा सर्व प्रकार कदीर मौलाना यांच्या घरी घडला नसून, जेवणाचा कार्यक्रम मुलीकडे होता. तर कदीर मौलाना यांच्याघरी होणारा कार्यक्रम आज आहे. अशी माहिती देण्यात ( Food Poisoning In Politician son marriage ) आली.