औरंगाबाद- दुष्काळ असो की, अतिवृष्ठी दोन्ही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र मराठवाड्यात पाहायला मिळत आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे खचलेला शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यात 9 महिन्यात 656 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
हेही वाचा - कॅन्सरग्रस्तांसाठी युवतीने केले आपले केस दान
निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या गेल्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहण्यासाठी राजकीय नेत्यांनी पाहणी दौरे केले. मात्र, प्रत्यक्षात सरकार राबवत असलेल्या योजना, पाहणी दौरे याचा कुठलाच परिणाम होत नसल्याचे चित्र मराठवाड्यात आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्याचे समोर आले आहे.