महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एमपीएसीची परीक्षा पडली पार; औरंगाबादमध्ये ६ कोरोना बाधितांनीही दिला पेपर - एमपीएसी परीक्षा औरंगाबाद

योगाने दिलेल्या सूचनांप्रमाणे सुरक्षेची काळजी घेत आणि इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी बाळगत त्या नऊ परीक्षार्थींची कोविड १९ चे निमय पाळत स्वतंत्र हॉलमध्ये परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती, यावेळी साठी ६ कोरोना बाधित तर कोरोनाची लक्षणे असणाऱ्या ३ परीक्षार्थींनी परीक्षा दिली.

एमपीएसीची परीक्षा पडली पार
एमपीएसीची परीक्षा पडली पार

By

Published : Mar 22, 2021, 6:51 AM IST

औरंगाबाद- कोरोनाच्या प्रभावाखालीच रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण १९ हजार ६४६ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी पहिल्या सत्रात १३ हजार ३४६ जणांनी (६७.९३ टक्के) परीक्षा दिली. तर दुसऱ्या सत्रात १३ हजार ६२७ असे(६९.३७ टक्के) परीक्षार्थींनी परीक्षा दिल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील स्पर्धा परीक्षा कक्षाच्या वतीने देण्यात आली. तर कोरोना बाधित विद्यार्थ्यांनीही ळी परीक्षा दिल्याचीही माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

एमपीएसीची परीक्षा पडली पार

६ कोरोनाबाधितांनी दिली परीक्षा-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने शहरातील ५९ परीक्षा केंद्रांवर रविवारी विविध पदांसाठीची पूर्व परीक्षा पार पडली. आयोगाने दिलेल्या सूचनांप्रमाणे सुरक्षेची काळजी घेत आणि इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी बाळगत त्या नऊ परीक्षार्थींची कोविड १९ चे निमय पाळत स्वतंत्र हॉलमध्ये परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती, यावेळी साठी ६ कोरोना बाधित तर कोरोनाची लक्षणे असणाऱ्या ३ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कडक लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे हाल-

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औरंगाबाद शहरात अंशत: लॉकडाऊन तर शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेर गावाहून बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथून आलेल्या परीक्षार्थींचे चांगलेच हाल झालेे. जाण्या-येण्यासाठी बस सुरू असल्या तरी रिक्षा वाहकांनी अधिकचे भाडे वसूल केल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. लॉकडाऊमुळे सर्व दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने, हाटेल बंद असल्याने जेवणाचे आणि सकाळच्या नाशत्याचे देखील हाल झाल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. दोन तीन केंद्रांवर परीक्षार्थींची जेवणाची व्यवस्था होती. परंतु इतरांचे मात्र हालच झाले. हे नसे थोडे की परीक्षा केंद्रावर येण्यासाठी जिथे वीस ते तीस रुपये लागत होते तिथे रिक्षाचालकांनी ६० ते १०० रुपये भाडे घेतल्याचेही परीक्षार्थींनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details