महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पैठण शहरात 55 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या - Paithan POLICE NEWS

पैठण शहरातील इंदिरा नगर भागातील एका 55 वर्षीय व्यक्तीने जवळच असलेल्या शेतातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास पैठण पोलीस करत आहेत.

55-year-old-man-committed-suicide-in-paithan-city
पैठण शहरात 55 वर्षीय व्यक्तीची गळफास घेवून आत्महत्या

By

Published : Dec 6, 2019, 2:45 AM IST

औरंगाबाद - पैठण शहरातील इंदिरा नगर भागातील एका 55 वर्षीय व्यक्तीने जवळच असेलल्या शेतातील एका लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी समोर आली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राधाकिसन सुखदेव भावदेव भावले (वय 55, रा इंदिरानगर, पैठण) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मृत राधाकिसन भावले हे ट्रक्टर चालक होते. त्यांनी बुधवारी रात्री उशिरो पाचोड रस्त्यावरील दोन नंबर चारी जवळच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी शेतकरी शेतात जात असतांना त्यांना झाडाला लटकलेला एक मृतदेह दिसला. बुधवारी रात्री राधाकिसन घरी आले नाहीत. कुटुबांतील लोकांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, ते कुठेही आढळून आले नाहीत. शेवटी गुरूवारी सकाळी काही शेतकऱ्यांना दोन नंबर चारी येथे लिंबाच्या झाडाला लटकतांना त्यांचा मृतदेह दिसला.

शेतकऱ्यांनी घटनेची माहीती तात्काळ पैठण पोलिसांना कळवली. पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करुन मृतदेह राधाकिसन भावले यांचा असल्याची ओळख पटवली. त्यांच्या नातेवाईकांना बोलावून मृत देह खाली उतरुन उत्तरिय तपासणीसाठी पैठण येथील शासकीय रूग्णालयात पाठवला. पैठण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक नागलोत हे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details