महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'औरंगाबादेत लॉकडाऊन काळात 50 हजार तपासण्या, पोलिसांच्या मदतीला पालिकेचे अधिकारी तैनात'

प्रत्येक मार्गावर 24 तास चित्रीकरण करण्यात येईल. पोलीस आणि आरोग्य अधिकारी कर्मचारी यांनाच दुचाकी वापरण्याची परवानगी असेल. सरकारी पेट्रोल पंपावरच पेट्रोल भरता येईल. यामध्ये फक्त सरकारी वाहन आणि अत्यावश्यक वाहन यांनाच पेट्रोल भरता येईल. औषध दुकानाबाबत बैठक घेत आहोत. त्यामध्ये त्यांना काही तास दुकान उघड ठेवण्यासाठी परवानगी देण्याचा विचार आहे. लोकांनी बाहेर येण टाळले तरच परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो, असे आयुक्त पांडे म्हणाले.

aurangabad latest news  aurangabad corona update  aurangabad 8 days lockdown  औरंगाबाद कोरोना अपडेट  औरंगाबाद लॉकडाऊन  औरंगाबाद लेटेस्ट न्यूज  लॉकडाऊनमधील तपासण्या औरंगाबाद
महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे

By

Published : Jul 7, 2020, 4:53 PM IST

औरंगाबाद - शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे 10 ते 18 जुलैमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या लॉकडाऊनमध्ये शंभर टक्के बंद असणार आहे. बँकसह इतर आस्थापनाही बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. दूध आणि पेपर वाटपासाठी सकाळी 6 ते 8 याकाळात मुभा असेल. या काळात ५० हजार तपासण्या करणार असल्याचे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी सांगितले.

'औरंगाबादेत लॉकडाऊन काळात 50 हजार तपासण्या, पोलिसांच्या मदतीला पालिकेचे अधिकारी तैनात'

प्रत्येक मार्गावर 24 तास चित्रीकरण करण्यात येईल. पोलीस आणि आरोग्य अधिकारी कर्मचारी यांनाच दुचाकी वापरण्याची परवानगी असेल. सरकारी पेट्रोल पंपावरच पेट्रोल भरता येईल. यामध्ये फक्त सरकारी वाहन आणि अत्यावश्यक वाहन यांनाच पेट्रोल भरता येईल. औषध दुकानाबाबत बैठक घेत आहोत. त्यामध्ये त्यांना काही तास दुकान उघड ठेवण्यासाठी परवानगी देण्याचा विचार आहे. लोकांनी बाहेर येण टाळले तरच परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो, असे आयुक्त पांडे म्हणाले.

लॉकडाऊनच्या काळात नागरिक बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे लोकांचा संपर्क कमी होईल. त्यामुळे संसर्ग थांबवण्यास मदत होईल. औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे त्याठिकाणी जास्त तपासणी केली जाणार आहे. पोलीस मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी चार भागात वर्गीकरण करून कर्मचारी नेमले जाणार आहेत. पन्नास पॉईंटवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी नेमले जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

बंदच्या काळात जिल्ह्यातील बाहेरील नागरिकांनी शहरात येऊ नये. येत असतील तर प्रत्येक मार्गावर वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येणारी तपासणी करावी लागेल. यासाठी पाच ते सहा पॉईंट असणार आहेत. तपासणी केल्यावर त्यांना कॉरंटाइन सेंटरमध्ये नेले जाईल. अहवाल निगेटिव्ह आले तर त्यांना शहरात सोडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. आज 80 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आता औरंगाबादमध्ये एकूण रुग्णाची संख्या 7097 वर गेली आहे. 3571 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 3208 रुग्णावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 318 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी हा लॉकडाऊन कडक पाळला तर औरंगाबादमधील संसर्ग कमी करण्यात यश येईल. त्यामुळे औरंगाबादकरांसाठी हा लॉकडाउन महत्वाचा असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details