औरंगाबाद -औरंगाबाद तालुक्यातील वडखा गावात 5 युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सर्व युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आलं आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भालगाव येथील 9 युवक गोबी तोडण्यासाठी वरझडी येथे आले होते. घरी परत जात असताना नाथनगर वडखा येथून जात असताना भरलेला तलाव पाहून त्यातील 5 जणांना पोहण्याचा मोह आवरला नाही. ते पाण्यात उतरले असता पाण्याचा आणि त्यातील गाळाचा अंदाज न आल्याने पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
औरंगाबाद तालुक्यात पाच तरुणांचा तलावात बुडून मृत्यू - 5 जणांचा तलावात बुडून मृत्यू
औरंगाबाद तालुक्यातील वडखा गावात 5 युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सर्व युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आलं आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी भालगाव येथील 5 जण गोबी तोडण्यास वरझडी येथे आले होते. दुपारी एकच्या सुमारास घरी परत जात असताना 1) समीर शेख मुबारक शेख (वय 17) 2) शेख अन्सार शेख सत्तारा (वय 17) 3)आतीक युसुफ शेख (वय 18) 4) तालेब युसुफ शेख (वय 21) 5) सोहेल युसुफ शेख (वय 16) सर्व नाथनगर तलाव येथे अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले. अचानक हे सर्व ओरडू लागले. त्यामुळे तलावाच्या काठावर बसलेल्या 4 जणांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, लोकांची मदत होईपर्यंत उशीर झाला. बघताबघता पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिक गावकरी व फायर ब्रिगेडच्या मदतीने पाचही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून घाटी दवाखाना औरंगाबाद येथे पाठविण्यात आले. बकरी ईदच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने भालगाव येथे दुःखाचे वातावरण पसरले आहे.