औरंगाबाद- कन्नड शहरात आज 5 कोरोनाबधित रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबधितांची संख्या आता 8 वर पोहोचली आहे. त्यामुळे, शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कन्नड शहरात आणखी 5 करोनाबाधित रुग्णांची भर ; एकूण रुग्ण संख्या 8 - कोरोना आढावा कन्नड
एकूण 8 कोरोनाबाधितांचा कन्नडच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी दिली आहे.
बुधवारी कन्नड खासगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणारी व्यक्ती कोरोनाबधित असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर त्याची पत्नी व दीड वर्षाचा मुलगा कोरोनाबाधित आढळल्याने बधितांची संख्या 3 वर गेली होती. तर रविवारी याच बाधिताच्या संपर्कातील ड्रायव्हर (वय 38), त्याची पत्नी (वय 32), मुलगा (वय 20) दुसरा मुलगा (वय 17) हे एकाच कुटुंबातील चौघे आणि भोलेशोर कॉलनीमधील एक अन्य पुरुष (वय 28) असे 5 जण कोरोनाबाधित झाले आहे. भोलेशोर कॉलनीमधील रुग्ण हा कोरोनाबाधित असल्याची माहिती आज सकाळीच पुढे आली आहे. कोरोनाबाधितांवर कन्नडच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी दिली आहे.
तर आज आठही रुग्णांच्या संपर्कातील 22 जणांचे स्वाब नमुने घेतले असून त्यांना विलीगिकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देवगावकर यांनी सांगितले आहे.