औरंगाबाद/नाशिक :नाशिक आग दूर्घटनेतील (Nahisk Jindal company fire) मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. (5 lakh Rs help to victim of Jindal Company Fire). येथील जिंदाल फॅक्टरीत लागलेल्या आगीत 17 जण जखमी झाले असून, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. तसेच आणखी तीन कामगार अडकले असून त्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आधी सरकार सर्वपरी मदत करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथे दिली. येथील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. मात्र इगतपुरी येथे घटना घडल्यामुळे ते भाषण न करता मुंबईकडे रवाना झाले.
जिंदाल स्फोट प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार व आमदार हिरामण खों सकार यांनी घटनास्थळी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी जखमींवर उपचार सुरू असलेल्या सुयश हॉस्पिटल येथे रुग्णांची विचारपूस केली. मुख्यमंत्री म्हणाले की, घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे. सर्वच यंत्रणा आपली भूमिका चोख बजावत आहे. केमिकल कंपनी असल्याने आग विझवण्यात काहीसा विलंब येत आहे. या स्फोटा प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.