औरंगाबाद - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा देशासह राज्यात प्रादुर्भाव वाढत असताना औरंगाबादमधून दिलासादायक बातमी आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाचा उपचार घेणाऱ्या 5 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये घाटी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारकाचा समावेश आहे. याआधी 3 जणांना घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे आतापर्यंत 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
औरंगाबादमध्ये एकाच दिवशी कोरोनाच्या 5 रुग्णांना सोडले - aurnagabad news
औरंगाबादमध्ये कोरोनाचा उपचार घेणाऱ्या 5 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये घाटी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारकाचा समावेश आहे. याआधी 3 जणांना घरी सोडण्यात आले होते.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील एका पुरुष परिचाकाला कोरोनाची लागण झाली होती. आज तो परिचारक कोरोनामुक्त झाला. त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, आणि तो घरी परतला. तो ज्या भागात राहतात त्या भागातील नागरिकांनी या परिचारकांच्या टाळ्या वाजवून स्वागत केलं. नागरिकांनी रांगेत उभे राहून या रुग्णांचे स्वागत केले. नागरिकांनी केलेल्या स्वागताने परिचारकही गहिवरून गेले. त्यांनी लोकांना नमस्कार करत त्यांचे स्वागत स्वीकारले.
औरंगाबादमध्ये एकाच दिवशी 5 लोक कोरोनामुक्त झाले असले तरी एक रुग्ण वाढला आहे. समता नगरमध्ये राहणाऱ्या 38 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 30 झाली आहे. या रुग्णांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आता 19 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. एकाच दिवशी 5 जण कोरोनामुक्त झाल्याने औरंगाबादकरांसाठी ही दिलासा देणारी बाब मानली जात आहे.