महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन खोल्यांमध्ये ठेवले होते 45-50 परप्रांतीयांना, अखेर प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी स्थलांतर

शाळेत लोकांना कोंबून ठेवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली. त्यामुळे, या सर्वांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवारी रात्री मनपा शाळेतून शरदचंद्र पवार पॉलिटेक्निकल महाविद्यालय याठिकाणी स्थलांतरित केले.

दोन रुममध्ये 45 परप्रांतीयांना होते ठेवले
दोन रुममध्ये 45 परप्रांतीयांना होते ठेवले

By

Published : Apr 5, 2020, 11:14 AM IST

औरंगाबाद- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश, बिहार, सांगली येथील लोक पायी आपल्या गावी निघाले होते. परंतु, या लोकांना औरंगाबादच्या वेशीवर अडवण्यात आले होते. त्यानंतर या लोकांना गारखेडा परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले. दोन खोल्यांमध्ये एकूण 45 ते 50 मजुरांना ठेवण्यात आले होते. याबाबत सर्वात आधी ईटीव्हीने वृत्त प्रकाशित केल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने रिट याचिका दाखल करून घेतली होती.

शाळेत लोकांना कोंबून ठेवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली. त्यामुळे, या सर्वांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवारी रात्री मनपा शाळेतून शरदचंद्र पवार पॉलिटेक्निकल महाविद्यालय याठिकाणी स्थलांतरित केले.

देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे जो जिथे आहे त्याने तिथेच राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. अडकलेल्या लोकांना भौतिक सुविधा मिळाव्यात किंवा त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था व्हावी, असे आदेश आहेत. अशात औरंगाबादेत अडकलेल्या लोकांना शाळेत डांबून ठेवण्यात आले होते. हे वृत्त समोर येताच प्रशासन जागे झाले.

याप्रकरणी न्यायालयाने नोटीस दिल्यावर शाळेत ठेवण्यात आलेल्या सर्व लोकांना तातडीने निपाणी येथील शरदचंद्र पॉलिटेक्निकल तंत्र महाविद्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांचे चांगल्या प्रतीचे वस्तीगृह असल्यामुळे या मजुरांना चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत. या महाविद्यालयात राहण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details