औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कारागृहात असणाऱ्या बंदीना विशिष्ठ काळासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातून 87 बंदींना सोडण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत. मात्र, गुन्ह्यांची संख्या अधिक असल्याने 42 बंदीना सोडण्यात आले आहे.
औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातून 42 बंदींची मर्यादित काळासाठी सुटका - corona updates
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातून येथील ४२ बंदींना मर्यादित काळासाठी घरी सोडण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोडण्यात आलेले बंदी 45 दिवसांसाठी आपल्या घरी राहू शकणार आहेत.
हर्सूल कारागृह
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातून येथील ४२ बंदींना मर्यादित काळासाठी घरी सोडण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोडण्यात आलेले बंदी 45 दिवसांसाठी आपल्या घरी राहू शकणार आहेत. या कालावधीत या बंदीना घरीच राहण्याचे आदेश असून कोरोनाबाबत त्यांना ज्ञान असावे याकरिता त्यांना विविध चित्रफीत आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून संसर्गाबाबत काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचेही कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव म्हणाले.