महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरात असलेल्या झाडाला गळफास लावून घेत ३६ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

असिफ याच्या खिशात चिठ्ठी सापडली चिठ्ठी लिहिले आहे, की मी स्वतः इच्छेने आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये.

घरात असलेल्या झाडाला गळफास लावून घेत ३६ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
घरात असलेल्या झाडाला गळफास लावून घेत ३६ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

By

Published : Jun 1, 2021, 9:07 PM IST

औरंगाबाद - मी स्वतः इच्छेने आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी लिहून 36 वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 1) उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घरातील सर्व मंडळी लग्नाला गेले अन..
शेख असिफ शेख अनवर (वय 36, रा. सलमा मशीद जवळ, संजय नगर) बायजीपुर हार्डवेअर दुकानात काम करत होता. मात्र लॉकडाऊन पासून काम बंद होत. यामुळे घरीच होता. दरम्यान सोमवार ता. 31 रोजी घरातील सर्व मंडळी लग्नाला गेले. यावेळी असिफ हा घरी एकटाच होता. घरात असलेल्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. दरम्यान लग्न आटपून घरचे घरी आल्यानंतर घरच्यांना हा प्रकार लक्षात आला. यावेळी तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

खिशात चिठ्ठी सापडली

असिफ याच्या खिशात चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत लिहिले आहे, की मी स्वतः इच्छेने आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जे. जी. जेढर करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details