औरंगाबाद- आसेगाव वरून वाळूज एमआयडीसी मध्ये कामाचे पैसे आणण्यासाठी पायी जाणाऱ्या एका महिलेला पाठीमागून आलेल्या दुचाकीने धडक दिली. त्यामुळे डोक्याला मार लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार रोजी घडली आहे.
कामाचे पैसे आणण्यासाठी जात होत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता संजय थोरात (वय ३२ रा.असेगाव ता.गंगापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. संगीता या मोलमजुरी करतात. काही दिवसांपूर्वी केलेल्या कामाचे पैसे आणण्यासाठी त्या आसेगाव वरून वाळूज एमआयडीसी मध्ये पायी जात होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. यावेळी त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. संगीता यांच्या पश्चात पती, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचा पुढील तपास दौलताबाद पोलीस करत आहेत.