औरंगाबाद- बुलेट, फ्रीज, गिरणी इत्यादी महागड्या वस्तू स्वस्तात देण्याचे आमिष दाखवत ३० जणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आणि एक महिले विरोधात पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वंभर गावंडे, सुरेखा मनाजी म्हेत्रे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
संजयनगर बायजीपुरा येथील अंगणवाडी सेविका संगीता कस्तुरे या ८ मे'ला महिला दिनानिमित्त पुंडलीकनगर येथे गेल्या होत्या. तेथे त्यांना सुरेखा म्हेत्रे नावाची महिला भेटली. तिने बचतगट चालवत असल्याची बतावणी करून आपन फ्रीज, वाहने, संसारोपयोगी महागड्या वस्तू बचतगट मार्फत देत आहोत असे सांगितले. त्यानंतर जून महिन्यात सुरेखा यांनी कस्तुरे यांची आरोपी गावंडेशी भेट घातली. त्यावेळी मीच हा गट चालवतो, तुम्ही निर्धास्त होऊन पैसे जमा करा असे त्याने सांगितले.