औरंगाबाद - वैजापूर रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात ३युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री ११.३० वाजता जरुळ फाट्याजवळ हा अपघात झाला.
ट्रकची कारला धडक, ३ जण जागीच ठार - धडक
वैजापूर रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
वैभव कुंदे (२५), अर्जुन सोनवणे (२२), संतोष वाणी (२५) अस मृत युवकांची नावे आहेत. हे तिघे युवक कारमधून वैजापूरच्या दिशेने येत होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेत कार ट्रकच्या खाली गेली. त्यावेळी तिघांचाही या अपघातात मृत्यू झाला. स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने कारमध्ये अडकलेले तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मृत अर्जुन आणि संतोष हे दोघे वैजापूर येथील रहिवासी होते. वैभव आणि अर्जुन वैजापूरच्या एका खाजगी रुग्णालयात काम करत होते, तर संतोष हा कापड दुकानात काम करत होता. अपघाताच्या वेळी संतोष वाणी कार चालवत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी वैजापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.