महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत कोरोनाचा दुसरा संशयित रुग्ण; प्राध्यापिकेला लागण झाल्याचा संशय

शहरातील एका 59 वर्षीय महिला प्राध्यापकाला कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या 36 वर्षीय प्राध्यापिकेला कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे.

By

Published : Mar 17, 2020, 12:58 PM IST

औरंगाबाद - कोरोनाची लागण झालेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्या प्राध्यापिकेला कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. या 36 वर्षीय महिला प्राध्यापकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

औरंगाबादेत कोरोनाचा दुसरा संशयित रूग्ण

शहरातील एका 59 वर्षीय महिला प्राध्यापकाला कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी आरोग्य विभागाने सुरू केली. दोन दिवसांमध्ये त्या राहत असलेल्या परिसरातील तीन किलोमीटर पर्यंतच्या घरांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा -पुणे जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी...

कोरोनाची लागण झालेल्या महिलेवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आहे. या दोन्ही महिला प्राध्यापक शिकवत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.

महाविद्यालयातील 726 विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 59 वर्षीय कोरोनाग्रस्त महिला प्राध्यापक राहत असलेल्या सिडको भागातील 1 हजार 252 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 126 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 80 जणांचे समुपदेशन केल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details