महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंपनी मालकाचा कामगार महिलेचा घरी जाऊन विनयभंग; वाळूज पोलिसांकडून आरोपीला अटक - औरंगाबाद क्राईम न्यूज

पीडित महिलेने आजारी पती रुग्णालयातून परत आल्यानंतर त्यांना घटनेची माहिती दिली. पतीने धीर दिल्यानंतर महिलेने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी मालकाला अटक केली आहे.

विनयभंग
विनयभंग

By

Published : Jun 9, 2021, 9:34 AM IST

औरंगाबाद- कंपनीत काम करणाऱ्या २९ वर्षीय महिलेच्या घरी जाऊन मालकाने तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कंपनी मालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. सय्यद अश्फाक (रा.बिडकीन) असे आरोपी मालकाचे नाव आहे.

विनयभंगानंतर पीडितेला दमदाटी

वाळूजमधील के-९० सेक्टरमधील कंपनीचे मालक सय्यद अश्फाक (रा.बिडकीन) त्यांच्या कंपनीत पीडिता पूर्वी काम करत होती. प्रेस मशीनवर काम करताना ८ एप्रिल रोजी दुपारी तिच्या डाव्या हाताचे बोट मशीनमध्ये अडकून तुटले. त्यानंतर महिला घरी होती. या काळात कंपनी मालक सय्यद हा घरी जाऊन तिची व तिच्या आजारी पतीची विचारपूस करायचा. त्यांच्या उपचाराचा खर्च करण्याचे आमिष दाखवून सदर महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा. मात्र, महिला त्यास नकार देत होती. ‘तू माझ्यासोबत राहा अन्यथा तुझी मुलगी, आजारी पती व तुला मी औरंगाबादमध्ये राहू देणार नाही. तसेच याबाबत इतर कोणाला किंवा पोलिसांत माहिती दिली तर ठार मारून टाकेल,' अशी धमकीही कंपनी मालकाने दिल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details