महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 27 वा नामविस्तार दिन उत्साहात - औरंगाबाद विद्यापीठ नामविस्तार दिन बातमी

मराठवाडा विद्यापीठाचा 27 वा नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी मोठा लढा उभारण्यात आला होता. या लढ्यात बलिदान देणाऱ्या आंदोलकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

27th-renaming-day-celebrate-babasaheb-ambedkar-marathwada-university
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 27 वा नामविस्तार दिन उत्साहात

By

Published : Jan 14, 2021, 5:19 PM IST

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 27 वा नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी मोठा लढा उभारण्यात आला होता. या लढ्यात बलिदान देणाऱ्या आंदोलकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. कोरोनामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा सोहळा यंदा मात्र रद्द करण्यात आला. नागरिकांनी गर्दी न करता घरूनच अभिवादन करा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

प्रतिनिधीचा रिपोर्ट

17 वर्षाच्या लढ्या नंतर झाला नामविस्तार -

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. याविद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव द्यावे, या मागणीसाठी तब्बल 17 वर्षे लढा उभारावा लागला. तसेच अनेकांना बलिदान द्यावे लागले. अखेर शरद पवार मुख्यमंत्री असताना 14 जानेवारी 1994 ला मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, असे करण्यात आले.

गोरगरिबांसाठी खुली झाले शिक्षणाचे दार -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर काही काळ औरंगाबादेत वास्तव्यास होते. त्यावेळी त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडण्याची सुरुवात या निमित्ताने झाली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात जावे लागायचे. ते प्रत्येकाला शक्य नव्हते. मराठवाड्यात एक विद्यापीठ असावे, अशी अपेक्षा बाबासाहेबांनी व्यक्त केली. तसेच त्यासाठी प्रयत्नही केले. त्यानंतर 1953 मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 1977 ते 1994 या काळात नामांतरासाठी लढा उभारला आणि 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले.

कोरोनामुळे नागरिकांनी घरूनच केले अभिवादन -

कोरोनाच्या अनुषंगाने विद्यापीठ परिसरात अभिवादन करण्यासाठी गर्दी टाळत घरूनच अभिवादन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. विद्यापीठ परिसरात चोख पोलीस बंदोबस्तदेखील लावण्यात आला होता. या आवाहनाला सकाळच्या सत्रात आंबेडकरी अनुयायांनी प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. यंदा कुठल्याच सभा किंवा सोहळे परिसरात घेण्यात आले नाहीत. त्यामुळे नामविस्तार दिनावर कोरोनाचे सावट दिसून आले.

हेही वाचा- कौटुंबिक गोष्टींमध्ये राजकीय भूमिका नको; मुंडे प्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details