औरंगाबाद- जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 26 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या 1212 झाली आहे, तर मृतांची संख्या 41 वर गेली आहे.
औरंगाबादमध्ये 26 कोरोनाबाधित वाढले; रुग्णसंख्या पोहोचली 1212 वर - कोरोना वायरस लाई्व्ह अपडेट
औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी सकाळी 26 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्रशासनाला मिळाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1212 वर पोहोचली आहे तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे.
सकाळी आलेल्या अहवालानुसार 26 कोरोनाबाधितांमध्ये जयभीम नगर (5), गरम पाणी (2) रेहमानिया कॉलनी (2) कवरपल्ली, राजा बाजार (1), सुराणा नगर (1), मिल कॉर्नर (1) न्याय नगर (4), भवानी नगर, जुना मोंढा (2), रहीम नगर, जसवंतपुरा (1), पुंडलिक नगर, गल्ली नं. 10 (1), सातारा परिसर (1), जवाहर कॉलनी (1), टाइम्स कॉलनी, कटकट गेट (3) एन -2 सिडको (1) या भागातील व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये 16 पुरूष आणि 10 महिला आहेत.
गुरुवारी दुपारनंतर कोरोनाचे उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचे निधन झाले. 48 वर्षीय व्यक्तीचा आणि 65 वर्षीय वृद्धाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 48 वर्षीय व्यक्तीला मंगळवारी उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला आणि संध्याकाळी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. निमोनिया विथ कोविड 19, हायपरटेन्शन असे या व्यक्तीचे मृत्यूचे कारण देण्यात आले. 65 वर्षीय वृद्धाला बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी मृत्यू झाल्यांनतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या दोन मृत्यूंमुळे औरंगाबादेत मृत्यूंची संख्या 41 वर पोहचली आहे.