औरंगाबाद- सलग सातव्या दिवशी औरंगाबादेत कोरोनाचे 25हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी दिवसभरात 25 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने संख्या 282 वर गेली आहे. रविवारी सकाळी 17 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सायंकाळी पुन्हा आठ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे.
औरंगाबादेत आज दिवसभरात कोरोनाचे 25 नवीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 282वर - corona in aurangabad
औरंगाबादेत कोरोनाचे 25हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी दिवसभरात 25 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने संख्या 282वर गेली आहे.

औरंगाबादेत आज दिवसभरात कोरोनाचे 25 नवीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 282 वर
सकाळी आढळून आलेल्या 17 रुग्णांमध्ये मुकुंदवाडी येथील 16, तर बायजीपुरा येथील एका रुग्णाचा समावेश आहे, तर सायंकाळी आढळून आलेल्या आठ रुग्णांत गुलाबवाडी येथील 3 तर संजयनगर-मुकुंदवाडी येथील 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. औरंगाबाद हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालले आहे. गेल्या काही दिवसांतील रुग्णांची वाढ चिंताजनक आहे.