औरंगाबाद - किरण शेषराव मोरे (२४) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने मित्राला मेसेज पाठविला की, मी आत्महत्या करतोय, मित्राकडे १८ हजार रुपये आहेत. त्याच्याकडून घेऊन ते वडिलांना दे. असे सांगून पोलीसाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना क्रांती चौक पोलीस कॉलनीत घडली.
सिल्लोड येथे तरुणाची आत्महत्या
किरण शेषराव मोरे (२४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. किरणचे वडील सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात हवालदार आहेत. नोकरी सिल्लोडला असल्याने ते पत्नीसह सिल्लोडला राहतात. क्रांती चौक पोलीस कॉलनीतील घर त्यांच्या नावाने असल्याने त्यांचा मुलगा त्या ठिकाणी राहत होता. त्यांचा मोठा मुलगा नोकरी करतो. किरणही अधूनमधून सिल्लोडला ये-जा करीत होता.