औरंगाबाद - जिल्ह्याला कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असून आज सकाळी पुन्हा 24 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 651 वर जाऊन पोहचली आहे. दिवसभरात हा आकडा अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचे 24 नवे रूग्ण; एकूण रूग्णसंख्या 651 वर - औरंगाबाद एकूण कोरोना रूग्ण संख्या
कोरोनावर नियंत्रण मिळवणे औरंगाबाद जिल्हा प्रशासनाला अवघड जात असल्याचे दिसत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. आज सकाळी पुन्हा 24 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 651 वर जाऊन पोहचली आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये पुंडलिकनगर गल्ली 2, संजय नगर - 5, एन7 सिडको - 4, एन8 सिडको, रामनगर, प्रकाश नगर, मनपा कर्मचारी वसाहत, चिकलठाणा, भडकलगेट, दत्तनगर, शहानुरमिया दर्गा, गांधीनगर, रोशनगेट येथील प्रत्येकी एक व अन्य शहरातील 3, अशा 24 जणांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती घाटी रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.
दरम्यान, सोमवारी देखील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. दिवसभरात 68 नवे रुग्ण आढळून आले होते, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे प्रशासनाला अवघड जात असल्याचे दिसत आहेत. आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त रूग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत.