औरंगाबाद -जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी सकाळी आणखी २३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २३९ वर पोहोचली आहे.
औरंगाबादेत आज २३ कोरोनाबाधितांची नोंद, रुग्णसंख्या पोहोचली २३९ वर - कोरोना अपडेट महाराष्ट्र
औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या वाढीचे सत्र कायम असून पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 239 वर जाऊन पोहोचला आहे. आतापर्यंत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 24 रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
शहरात दररोज जवळपास कोरोनाचे २५ ते ३० रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी ३९ रुग्ण वाढले होते, तर शनिवारी सकाळी २३ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये नूर कॉलनी 5, बायजीपुरा 11, किलेअर्क भीमनगर 1, कैलासनगर 3, समतानगर 2, जयभीमनगर 1 असे 22 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.