औरंगाबाद- जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असताना गुरुवारी ६५ वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या महिलेची चौकशी केली असता या महिलेने दोन खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही दोन्ही रुग्णालये महानगर पालिकेने पुढील १३ दिवसांसाटी सील केले आहे. तशी नोटीसही रुग्णालयावर लावण्यात आली आहे.
कोरोनाबाधित वृद्ध महिलेवर उपचार केल्यानंतर औरंगाबादेतील दोन खासगी रुग्णालय सील
ना अहवाल पॉसिटीव्ह आलेल्या या महिलेला मधुमेह, रक्तदाब, आणि किडनीचा विकार आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात असल्याची माहिती महानगर पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली.
65 वर्षीय वृद्ध महिलेला १३ एप्रिल रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 16 एप्रिल रोजी महिलेचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. मात्र, १३ एप्रिल पूर्वी या महिलेने २ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखवण्यात आले होते. त्या काळात ही महिला जवळपास 15 जणांच्या संपर्कात आल्याच समोर आल्याने रुग्णालय सील करून त्या दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना होम कॉरनटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 28 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात २ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. तर, २ रुग्ण बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात 22, घाटी रुग्णालयात एक आणि खासगी रुग्णालयात एक अशा एकूण 24 कोरोनाबाधित रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात आज तपासण्यात आलेल्यांपैकी 52 जणांच्या लाळेचे नमुने शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) येथे पाठवले होते. तसेच 14 दिवस पूर्ण करणाऱ्या 09 कोविड रुग्णांचेही लाळेचे नमुने घेण्यात आलेले आहेत. सध्या रुग्णालयात 19 जणांना भरती करून देखरेखीखाली ठेवलेले आहे. तर 23 जणांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिलेला आहे, असे डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.