औरंगाबाद - पैठण तालुक्यातील देवगाव तांडा शिवारात विहिरीचे खोदकाम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडल्याची घटना घडली. यामध्ये 2 मजुरांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
देवगावतांडा येथील शेतकरी व विहीरमालक साहेबराव चव्हाण यांच्या शेतात नवीन विहिरीचे खोदकाम सुरु आहे. बुधवारी ३ वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वारे सुटल्याने विहिरीवर काम करणारे मजुर बाजुला उभ्या असलेल्या बैलगाडीखाली बसले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने विहीर मालक साहेबराव भाऊराव चव्हाण (वय 50 ) सतीश जानू राठोड (वय,२५ ) राहणार देवगावतांडा यांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. तर अमोल तुळशीराम राठोड (वय, 27), युवराज श्रीधर राठोड (वय 30) जैतालाल प्रभु चव्हाण (वय, 23 वर्षे) नितेश पंढरीनाथ चव्हाण (वय, 25) निलेश सुभाष चव्हाण (वय, 20) सर्व राहणार एकतुनी तांडा (ता.पैठण) हे गंभीररित्या जखमी झाले.
वीज कोसळून 2 जण ठार तर 5 जण जखमी - वीज कोसळून 2 जण ठार
पैठण तालुक्यातील देवगाव तांडा शिवारात विहिरीचे खोदकाम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडल्याची घटना घडली. यामध्ये 2 मजुरांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत.
जखमींवर आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.
वादळी वाऱ्याने मोसंबी झाली भुईसपाट
पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथील शेतकरी किसान शेख शफीक शेख रफीक शेख मुनीर शेख रफीक या दोघा भावांनी 6 एकरमध्ये मोसंबी फळबागाची लागवड केली आहे. ही झाडं जवळपास सात ते आठ वर्षाची झाली आहेत. मात्र, मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे यामधील जवळपास एक एकरातील झाड उखडून भुईसपाट झाली आहेत. यामुळे हे शेतकरी आता मोठ्या अडचणीत सापडले असून, गेल्या आठ वर्षापासून पोटच्या लेकराप्रमाणे जोपासलेली मोसंबीची झाडं वादळी वाऱ्यात भुईसपाट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या झाडांचे सरकारने पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकरी आता करत आहेत.