महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू - aurangabad news

शेतळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १५) दुपारी 3 वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील म्हस्की शिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. योगेश रघुनाथ जगताप (वय २१) रा. शिरे सायगाव अणि भावराव अप्पासाहेब जाधव (वय २५) रा. म्हस्की अशी त्यांची नावे आहेत.

vaijapur news
दोन मित्रांचा बुडून मृत्यू

By

Published : May 16, 2021, 10:44 AM IST

वैजापूर (औरंगाबाद) - शेतळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास तालुक्यातील म्हस्की शिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. योगेश रघुनाथ जगताप (वय २१) रा. शिरे सायगाव अणि भावराव आप्पासाहेब जाधव (वय २५) रा. म्हस्की अशी त्यांची नावे आहेत.

म्हस्की शिवारात असलेल्या शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने येथील दोन तरूण मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - राज्यात 34 हजार 848 नव्या रुग्णांची नोंद, तर एकाच दिवसात 960 रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details