औरंगाबाद- सेवानिवृत्त आरटीओ अधिकारी जाधव यांचे घर फोडून चांदीच्या साहित्यासह त्यांची बंदूक लंपास करणाऱ्या दोन अट्टल चोरांना गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली आहे. संतोष उर्फ बांग्या गणेश रामफळे आणि प्रशांत कचरू ठोंबरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरटीओ अधिकाऱ्याचे घरफोडून बंदूक,लाखोंचे साहित्य लंपास करणारे दोघे गजाआड - robbing
२ एप्रिलला निवृत्त आरटीओ अधिकारी जाधव यांच्या सिडको एन-१ परिसरात असलेल्या बंद घरातील दरवाजा तोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख रुपये किमतीचे चांदीचे साहित्य आणि त्यांची परवाना असलेली रिव्हॉल्वर लंपास केली होती
२ एप्रिलला निवृत्त आरटीओ अधिकारी जाधव यांच्या सिडको एन-१ परिसरात असलेल्या बंद घरातील दरवाजा तोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख रुपये किमतीचे चांदीचे साहित्य आणि त्यांची परवाना असलेली बंदूक लंपास केली होती. हे चोरीचे साहित्य विकण्यासाठी दोघेही शहरातील एकतानगर भागात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळताच त्यांनी परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली.
अटक करण्यात आलेले दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चोरी गेलेले साहित्य जप्त करण्यात आले असून या दोघांकडून शहरातील अजूनही अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.