औरंगाबाद- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या तब्बल १७० विद्यार्थिंनींची प्रकृती अचानक बिघडल्याची घटना घडली आहे. मुलींच्या वसतिगृहांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केल्यामुळे ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन करून विद्यापीठातील प्रत्येक वसतिगृह आणि ग्रंथालयामध्ये आर-ओ प्युरिफायर वॉटर प्लँट बसविण्याची मागणी केली आहे.
दूषित पाण्याने औरंगाबाद विद्यापीठातील १७० विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली, विद्यार्थ्यांचे प्रशासनाविरोधात आंदोलन
मुलींच्या वसतिगृहांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केल्यामुळे ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन करून विद्यापीठातील प्रत्येक वसतिगृह आणि ग्रंथालयामध्ये आर-ओ प्युरिफायर वॉटर प्लँट बसविण्याची मागणी केली आहे.
यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी हातात रिकाम्या पाण्याच्या बॉटल घेऊन 'कुलगुरू हमको पढणे दो, देश को आगे बढने दो', कुलगुरू मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनी प्रत्येक वसतिगृहासह विद्यापीठातील प्रत्येक विभागात आणि मुख्य ग्रंथालयात आरओ प्युरिफायर वॉटर प्लँट बसविण्याची मागणी केली. तसेच १७० विद्यार्थिनींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्या रुग्णालयाचा खर्च विद्यापीठ प्रशासनाने परत करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.