महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जायकवाडीतून आपेगाव-हिरडपुरीसाठी 1600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग - जायकवाडीतून अपेगाव-हिरडपुरीसाठी पाणी

पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या ४० हुन अधिक गावातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, गोदावरी नदीवरील आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात पैठण जायकवाडी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून १६०० क्युसेक प्रतितास वेगाने गोदावरीत पाणी सोडण्यात आले.

जायकवाडीतून अपेगाव-हिरडपुरीसाठी 1600 क्यूसेक पाणी

By

Published : Aug 12, 2019, 5:11 PM IST

औरंगाबाद - येथील पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या ४० हुन अधिक गावातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, गोदावरी नदीवरील आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात आज सोमवारी सकाळी ९ वाजता पैठण जायकवाडी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून १६०० क्युसेक प्रतितास वेगाने पाणी सोडण्यात आले. यामुळे गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जायकवाडीतून अपेगाव-हिरडपुरीसाठी 1600 क्यूसेक पाणी
आपेगाव व हिरडपुरी धरणात पाणी सोडा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मागील अनेक महिन्यापासून अंदोलने करुन प्रशासनाला वेठीस धरले होते. आज जायकवाडी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून 1600 क्यूसेक पाणी सोडण्यात आले. जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जातील म्हणून अनेक नागरिकांनी गर्दी केली. मात्र, फक्त धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे बघ्यांचा हिरमोड झाला. यावेळी नागरिकांनी घाबरु नये, अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details