महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनची संहारकता.. औरंगाबादजवळ १६ परप्रांतीय मजुरांना मालगाडीने चिरडले, एक गंभीर

By

Published : May 8, 2020, 7:59 AM IST

Updated : May 8, 2020, 3:32 PM IST

migrant labour crashed by train
परप्रांतीय मजूरांना रेल्वेने चिरडले

14:45 May 08

रेल्वे दुर्घटनेतील जखमींची आणि मृतांची नावे

धनसिंग गोंड, निरवेश सिंह गोंड, बुद्धराज सिंह गोंड, श्रीदयाल सिंह, रबेन्द्र सिंह गोंड, राजबोहरम पारस सिंह, दिपक सिंह, अशोक सिंह गौड, धर्मेंद्रसिंह गोंड, (रा. सर्व अंतवळी जि. शहडोल, मध्यप्रदेश), सुरेश सिंह कौल (जि. शहडोल, मध्यप्रदेश), बिगेंद्र सिंह चैनसिंग, प्रदीप सिंह गोंड, (रा. दोघे जमडी, ता. पाळी, जि. उमरिया मध्यप्रदेश), ब्रिजेश भेयादीन (रा. बहिरा इटोला, शहरगड चाटी, जि. शहडोल), मुनिमसिंह शिवरतन सिंह, (रा. नेवासा, बकेली ता. पाळी, जि. उमरिया), नेमशाह सिंह चमदु सिंह, (रा. नेवासा, बकेली, जि. उमरिया), अच्छेलाल सिंह (रा. चिल्हारी, मानपुर जि. उमरिया), संतोष नापित या सोळा जणांचा मृतात सामावेश आहे.

सज्जनसिंह माखनसिंह धुर्व (रा. पौडी ता. जुनावणी जिल्हा मंडल) खजेरी हा जखमी आहे. 

इंद्रलाल कमलसिंह धुर्वे (रा. पोवडी ता. घोगरी जि. मांडला), वेरेंद्रसिंग चेंनसिंह गौर (रा ममान ता पाली जि. उमरिया), शिवमानसिंह हिरालाल गौर (रा शाहारगड ता शाही जि. शहडोल हे तीघेजण रेल्वेपटरीच्या बाहेर असल्याने वाचले आहेत.

मजूर काम करत असलेल्या स्टील कंपनीने २० कामगारांची यादी दिली आहे. यातील १० मृतांची नावे स्पष्ट झाली असून इतरांची नावे समजली नाही. ईटीव्ही भारतने या नावांची पडताळणी केली आहे. 

11:17 May 08

महाराष्ट्र सरकारकडून रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये

औरंगाबादमधील रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येकी ५ लाख रुपये महाराष्ट्र सरकार देणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

10:36 May 08

औरंगाबाद जिल्ह्यातील बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

घटनास्थळावरून माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

10:11 May 08

१४ स्थलांतरीत मजूरांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू

आरोग्य कर्मचारी घटनास्थळावर

09:56 May 08

औरंगाबाद जिल्ह्यातील बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ मजूरांचा मृत्यू

बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायी निघाले होते.  

09:50 May 08

चालकाने रेल्वे थांबविण्याचा केला प्रयत्न - रेल्वे मंत्रालय

काही व्यक्तींना रुळावर पाहिल्यानंतर मालगाडी चालकाने गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व गाडीखाली चिरडले गेले. परभणी- मनमाड रेल्वे विभागातील बदनापूर आणि करमाड स्टेशनदरम्यान ही घटना घडली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.   

09:38 May 08

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख

या घटनेवर पंतप्रधान मोदींनीही दु:ख व्यक्त केले आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी बोलणे झाले असून याप्रकरणी ते लक्ष ठेवून आहेत, असे ट्विट मोदींनी केले आहे.  

09:33 May 08

परप्रांतीय मजूरांना रेल्वेने चिरडले

औरंगाबाद - शुक्रवारी भल्या पहाटेच एक मोठी भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायी निघाले होते. दरम्यान प्रवासात ते औरंगाबदपर्यंत आले होते. रात्र झाल्याने सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. एक जण गंभीर जखमी झाला आहे.  

09:27 May 08

औरंगाद ग्रामीण पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील

सर्व मजूर मध्यप्रदेशातील उमरीया आणि शाहडोल जिल्ह्यातील होते. गावी जाण्यासाठी पायी निघाले असता त्यांना रेल्वेने चिरडले. शुक्रवारी (ता. ८) पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले.

07:56 May 08

औरंगाबादमध्ये १६ परप्रांतीय मजूरांना रेल्वेने चिरडले

परप्रांतीय मजूरांना रेल्वेने चिरडले

औरंगाबाद - शुक्रवारी भल्या पहाटेच एक मोठी भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायी निघाले होते. दरम्यान प्रवासात ते औरंगाबदपर्यंत आले होते. रात्र झाल्याने सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. एक जण गंभीर जखमी झाला आहे.  

सर्व मजूर मध्यप्रदेशातील उमरीया आणि शाहडोल जिल्ह्यातील होते. गावी जाण्यासाठी पायी निघाले असता त्यांना रेल्वेने चिरडले. या घटनेवर पंतप्रधान मोदींनीही दु:ख व्यक्त केले आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी बोलणे झाले असून याप्रकरणी ते लक्ष ठेवून आहेत, असे ट्विट मोदींनी केले आहे.  

सध्या लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद आहे. मात्र, रेल्वेने मालवाहतूक काही प्रमाणात सुरू केली आहे. गुरुवारी (ता. ७) रेल्वेने मध्यप्रदेशातील मजुरांसाठी भोपाळला एक गाडी रवाना केली. त्यामुळे आपल्यालाही एखाद्या अशाच गाडीने गावी जाता येईल, या आशेने जालन्याच्या एका स्टील कंपनीचे ते मजूर रातोरात भुसावळकडे पायी निघाले होते. मात्र, प्रवासातच त्यांचा करुण अंत झाला.  

रात्र झाली म्हणून रुळावरच झोपले

बदनापूर ते करमाडच्या दरम्यान सटाणा शिवाराजवळ रात्र झाली म्हणून रेल्वे रुळावरच त्यांनी पथारी पसरली आणि झोपी गेले. मात्र, शुक्रवारी (ता. ८) पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. यात १६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १ जण जखमी झाला आहे.

जखमींवर उपचार करण्यासाठी पूर्णा (जि. परभणी) जंक्शन येऊन रेल्वे रुग्णवाहिकाही निघाल्याचे वृत्त आहे. यात रेल्वेचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.

सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहेत. सर्व मजूर जालन्यातील एका स्टील कंपनीत कामाला होते व सर्वजण मध्यप्रदेश राज्यातील होते. लॉकडाऊनमध्ये अडकल्यामुळे त्यांनी आपल्या राज्यात परतण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र घरच्या ओढीने सैरभैर झालेल्या कामगारांना घरी परतण्यापूर्वीच मृत्यूने कवटाळले. 

रेल्वे बंद असल्यामुळे गाडी येणार नाही या समजातून झोपले रुळावर

लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वे सेवा बंद आहे. मात्र सरकारने राज्यात अडकलेल्या  परप्रांतीय मजुरांसाठी विशेष श्रमिक गाड्यांची व्यवस्था केली आहे. काल (गुरुवारी) औरंगाबादहून भोपाळला एक विशेष गाडी रवाना करण्यात आली होती. आपल्यालाही अशाच एखाद्या गाडीने घरी परतता येईल या आशेने जालन्यातील हे मजूर रात्रीच औरंगाबादच्या दिशेने रेल्वे रुळावरूनच पायी निघाले. रेल्वे सेवा बंद असल्याने रुळावरून कोणतीच गाडी येणार नाही, या समजातून सर्व मजूर रुळावरच झोपी गेले, मात्र हा समजच त्यांच्या जीवावर उठला व हकनाक १६ मजुरांचा बळी गेला. 

रस्त्यात करमाडजवळ रेल्वे पटरीवर रात्री त्यांनी आसरा घेतला आणि रेल्वे सध्या बंद आहे कुठलीही रेल्वे येणार नाही, असा समज असल्याने ते रेल्वे पटरीवर झोपले. जवळपास 17 जन रेल्वे पटरीवर झोपले होते. सकाळी सहाच्या सुमारास मालगाडी आली आणि या सर्व मजूरांना चिरडून निघून गेली. 
 

जालन्यातील स्टील कारखान्यात होते कामाला

यामध्ये जवळपास १६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण यामध्ये जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना परभणी झोनमध्ये उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे सर्व मजूर जालन्याच्या स्टील कारखान्यात काम करत होते. औरंगाबादहून मध्यप्रदेशला जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे त्या रेल्वेत आपली काही व्यवस्था होते का, हे पाहण्यासाठी हे मजूर औरंगाबादकडे येत होते, अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.

Last Updated : May 8, 2020, 3:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details