औरंगाबादेत कोरोनाचे १४ नवे रुग्ण आढळले, एकूण रुग्णसंख्या १४४वर - aurangabad corona patient
गेल्या चार दिवसात औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. सोमवार सायंकाळपासून ते गुरुवारी सकाळपर्यंत 91 रुग्ण वाढले आहेत.
औरंगाबाद - शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 14 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 144 वर गेली आहे.
वाढलेल्या 14 रुग्णांमध्ये जयभीम नगर, भावसिंग पुरा - 6, किलेअर्क - 1, असेफिया कॉलनी - 2, नूर कॉलनी - 1, कैलासनगर - 1, चिकलठाणा -1, सावरकर नगर - 1, घाटी परिसरातील - 1 रुग्णांचा समावेश आहे. जुन्या भागांसह नवीन भागात रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे.
गेल्या चार दिवसात औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. सोमवार सायंकाळपासून ते गुरुवारी सकाळपर्यंत 91 रुग्ण वाढले आहेत. ज्यात सोमवारी 29, मंगळवारी 27, बुधवारी 21, तर गुरुवारी सकाळी 14 रुग्ण आढळून आले आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनासमोर चिंता वाढली आहे.