महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत पाण्याच्या टँकरची क्रूझरला समोरा-समोर धडक; 14 जण गंभीर जखमी - 14 INJURED

या अपघातात १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. कन्नड रस्त्यावरील दिगाव फाट्याजवळ बुधवारी हा अपघात झाला. जखमी झालेल्यांमध्ये सहा मुली, सहा पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे.

औरंगाबाद अपघात

By

Published : May 30, 2019, 12:03 PM IST

औरंगाबाद- सिल्लोड तालुक्यात लग्न समारंभासाठी जाणाऱ्या क्रूझरला पाण्याच्या टँकरने समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. कन्नड रस्त्यावरील दिगाव फाट्याजवळ बुधवारी हा अपघात झाला. जखमी झालेल्यांमध्ये सहा मुली, सहा पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे. या सर्व जखमींवर औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातात जखमी झालेल्यांची नावे

साईंदास रायसिंग राठोड (वय २६), स्वाती विट्ठल पवार (वय १२), गेनूबाई हरजी राठोड (वय ६५), हीरालाल शामराव राठोड (वय ३०), नंदनी दासु, नंदनी विट्ठल राठोड, एकनाथ काशीनाथ राठोड, पायल विठुबाई पवार, रोहिदास धनु राठोड, दासुसेवा राठोड, बाबिताबाई एकनाथ राठोड, काजल सुंदरसिंग राठोड, संजय रामचंद्र राठोड, पार्वतीबाई आनंदा राठोड

सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा तांडा येथून क्रूझर वाहनात सतरा जण कन्नड तालुक्यातील जैतखेडा तांडा येथे अजय भीमराव राठोड यांच्या लग्नाला जात होते. सिल्लोड कन्नड रोडवरील दिगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरने क्रुझरला जोराची धडक दिली. अपघात होताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी झालेल्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींवर डॉ. उमेश विसपुते, डॉ. शेख हुजैफ, डॉ. शेख अल्तमश यांनी प्राथमिक उपचार केले. गंभीर जखमींवर औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

अपघातात क्रूझरचा चकनाचूर

अपघात एवढा भयंकर होता की, अपघात होताच दोन्ही वाहने ही रसत्यावरील पुलाच्याखाली फ़रफटत गेली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोराची व भयानक होती की, या अपघातात क्रूझरचा चकनाचूर झाला. सुदेवाने या भयंकर अपघातात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details