औरंगाबाद- राज्यात कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून अनेक उपायोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 21 मार्च ते 31 मार्च दरम्यान मद्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे तळीरामांची अचानक मद्य विक्री दुकानात गर्दी वाढली आहे. बंद कालावधीत लागेल एवढी दारू तळीराम एकदाच घेऊन जाताना दिसत आहेत.
11 दिवस मद्य दुकाने बंद... हेही वाचा-COVID-19 LIVE : देशात २२३ रुग्ण, तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२..
कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही दोन दिवस बंदचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच गर्दी आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने अकरा दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. हे आदेश सोशल मीडियावर व्हायरल होताच दुपार नंतर अचानक मद्यविक्री दुकानात गर्दी वाढली आहे.
11दिवसांसाठी लागणारा स्टॅाक तळीराम एकदाच खरेदी करत आहेत. महामारीचा विळखा वाढत आहे. त्याचा सामना सर्व जण करत आहेत. मात्र, तळीरामांना त्याचे काही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. ते मिळालेल्या सुट्ट्यांची मजा घेत आहेत.