महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार अब्दुल सत्तार, भाजप पदाधिकाऱ्यांत धक्काबुक्की - BJP party workers

औरंगाबादमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचे उद्घाटन तुम्ही कसे करू शकता, असा जाब विचारत भाजप पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्याचे उद्घाटन करणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांना रोखले. यावेळी सत्तार समर्थक आणि भाजप कार्यकर्ते या दोन्ही गटात धक्काबुक्की झाली.

आमदार अब्दुल सत्तार

By

Published : Mar 8, 2019, 11:38 PM IST

औरंगाबाद - भाजप पदाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचे उद्घाटन तुम्ही कसे करू शकता, असा जाब विचारत भाजप पदाधिकाऱ्यांनी उद्घाटन करणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांना रोखले. यावेळी सत्तार समर्थक आणि भाजप कार्यकर्ते या दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी सत्तार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

आमदार अब्दुल सत्तार

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे शहरातील रस्त्याच्या विकासकामांचे भूमिपूजन करत असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यांनी उद्घाटन थांबवून भाजपने मंजूर केलेल्या कामाचे उद्घाटन तुम्ही कसे करता असा जाब विचारला. यामुळे आमदार सत्तार चिडले आणि तुम्ही तिकडे जाऊन तक्रार करा, असे म्हणाले. यानंतर दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हे प्रकरण निवळले.

अब्दुल सत्तार हे नियम बाह्य कामे करत आहेत. या सर्व प्रकरणाची एक समिती नेमून चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशी दरम्यान तक्रारदारांनाही पुरावे सादर करण्याची मुभा द्यावी, असे निवेदन भाजपच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details