औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची आचरसंहिता काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून, २०१९ मध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल. भाजपचे २०० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. पण पंतप्रधानपदी कोणीही विराजमान होतील, कदाचित मोदींना पुन्हा संधी मिळेल, असा अंदाज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकारांशी बोलत होते.
२०१९ मध्ये सत्ता भाजपची येईल, मात्र मोदी पंतप्रधान नसतील - नारायण राणे
औरंगाबादमध्ये नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवणार असून, सुभाष किसनराव पाटील हे स्वाभिमान पक्षाचे उमेदवार असतील अशी घोषणा राणे यांनी केली आहे.
औरंगाबादमध्ये नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवणार असून, सुभाष किसनराव पाटील हे स्वाभिमान पक्षाचे उमेदवार असतील अशी घोषणा राणे यांनी केली आहे. औरंगाबादचे राजकारण पाहता सुभाष पाटील निवडून येतील असा दावाही राणे यांनी केला. औरंगाबादला शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव करणार असल्याचे राणे म्हणाले. सुभाष पाटील आधी शिवसेनेत होते, नंतर मनसे आणि नंतर त्यांनी स्वतःची मराठवाडा विकास सेना स्थापन केली. मात्र आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून ते लोकसभा निवडणूक लढवतील. राज्यात जिथे जिथे शिवसेना आहे, तिथे तिथे स्वाभिमान पक्ष निवडणूक लढवणार आहे. राज्यात किमान ५ जागा लढवणार असल्याची घोषणा राणे यांनी केली. आमच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदीला मत असे समजायला हरकत नाही असेही राणे म्हणाले, यावेळी राणे यांनी शिवसेना-भाजप युतीवर सुद्धा टीका केली. भाजप-शिवसेना युती फक्त सत्ता मिळवण्यासाठी आहे, 'तुझं माझं जमेना, तुझ्या विना करमेना' अस या दोघांच झाल आहे. शिवसेनेने काहीही काम केले नाही, आता सत्तेसाठी फक्त युती केली, असा टोला राणे यांनी लावला. नाणार प्रकल्प आणणारी शिवसेनाच होती, मंत्रीही शिवसेनेचेच होते. आणि आता नको म्हणणारीही शिवसेनाच आहे. नाणारला रद्द करण्याचा श्रेय हे आमचे असल्याचे राणे यांनी सांगितले. आचारसंहिता जाहीर झाल्यावर इतर उमेदवार सुद्धा घोषित करू असे राणे म्हणाले.